STORYMIRROR

Madhuri Dashpute

Inspirational

3  

Madhuri Dashpute

Inspirational

अन्नदाता

अन्नदाता

1 min
119

तूच खरा रे अन्नदाता

तूच खरा अन्नविधाता

तुझ्याच श्रमामुळे वीरे

अमुच्या घासाची चिंता


तूझ्या घामाच्या थेंबातुन

मोती शिंपीते सारी धरती

पुजोनी तूला सण पोळ्याला

ओवाळीतो आम्ही तूला आरती


सण तुझा पोळ्याचा

तूला शांती सुख लाभण्याचा

सालभरच्या थकल्या तनाला

विश्रांतीने सुखावण्याचा


तुझ्या या सणाला

करतो आम्ही तूला वंदन

पुजोनी तुला मनोभावे

सर्जा तूला रे करतो नमन🙏


तुझ्या अपार कष्टाने

बहरते, सजते, फुलते भुई

कसे फेडू पांग तुझे रे?

कसे होऊ आम्ही उतराई?


नाही फिटणार पांग तुझे रे

एक दिवसाच्या पूजनाने

जाणतो सारे आम्ही काही

तरीच पुजितो शुद्ध मनाने


तुझ्याविना कशी बहरणार?

फुलणार कशी काळी माय?

तुझ्या श्रमानेच फुलते

पडता तिजवर तुझे पाय!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational