रक्षाबंधन
रक्षाबंधन
सण रक्षाबंधनाचा खरंच अप्रतिम असतो
भावा बहिणीच्या प्रेमाचं गुपित जपतो
कितीही असू दे भांडणे, तंटा किंवा वाद
भाऊ बहीण या सणाला घालतात एकमेकांना साद
भावाच्या प्रेमासाठी बहीण आसूसलेली असते
त्याच्या फोन, संदेश, येण्याची वाट पाहत असते
कधी येईल भाऊराया ओवाळणीला घरी
वाट पाहत असते बहीण उभी राहून दारीं
दिसताच तो भाऊ हर्षुन जाते आतून
हृदयात घेते साऱ्या मायेच विश्व व्यापून
आठवणीना उजाळा देत जातात त्यात हरवून
कडू जातात विसरून गोड ठेवतात जपून
भाऊ असतो बहिणीसाठी तिचा अभिमान
तिचा असतो त्याच्यात गुंतलेला प्राण
जीव असतो तिचा तो असतो तिचा श्वास
भावा सारख्या कण्याची आयुष्यभर असते तिला आस
तिचा पाठीराखा तो तिचा कणा असतो
तिच्या वरच्या प्रेमाखातर साऱ्यांशी लढतो
बहिणीच्या डोळ्यातल्या अश्रूचा थेंब कधी होतो
भुईवरती ओसंडून तिला हर्षित करू पाहतो
असा हा भाऊराया तिचा असतो अभिमान
तिचा मान सन्मान आणि तिचा स्वाभिमान
आई इतका तिचा ही त्याच्यात असतो प्राण
तोच तर असतो तिची खरी माहेरची शान
