STORYMIRROR

Madhuri Dashpute

Inspirational

3  

Madhuri Dashpute

Inspirational

प्राणवायू

प्राणवायू

1 min
194

एक तरी झाड लाव माणसा तुझ्या दारीं

नटू दे ही सृष्टी हिरवाईने सारी!


तूला मलाच होईल बघ आनंद याचा

प्राणवायू बघ कसा मिळेल फुकटाचा!


गातील आनंदाने पक्षी, झाडें, वेली, फुले

वेलिंवर झुळतील झोपाळ्यांचे झुले!


साऱ्या सृष्टीला येईल आनंदाच उधाण

जीव जंतू सुखावतील हेच खरं समाधान!


निसर्ग हाच आहे खरा अनमोल ठेवा

म्हणून एक तरी झाड आपल्या दारीं लावा..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational