गौरव महाराष्ट्र राज्याचा..
गौरव महाराष्ट्र राज्याचा..
चला मुलांनो आज मिळूनी
जय जयकार करू.
महाराष्ट्राचे गीत गाऊनी
आनंद मनामनांत भरू....
१ मे महाराष्ट्र राज्य दिन
मिळुनि साजरा करू.
राज्याचे हे गीत गाऊनी
आनंद द्विगुणित करू...
जय जय महाराष्ट्र माझा
अभिमान मला माझ्या राज्याचा.
जय जय महाराष्ट्र माझा
अभिमान मला माझ्या राज्याचा...
महाराष्ट्राचा राज्यपक्षी
हा सुंदर हरियाल दिसे.
प्रिय सर्वांना राज्य वृक्ष
हा आंबा मनी वसे.
राज्यपुष्प हे ताम्हण असुनि
राज्य प्राणी शेकरू
महाराष्ट्र संतांची भूमी
मराठी भाषा मधु....
नमन आमुचे हे महाराष्ट्राला
वंदन करूनी या राज्याला..
नमन आमुचे हे महाराष्ट्राला
वंदन करूनी या राज्याला...
प्रत्येकाच्या मुखातून
हा आनंद हर्षिते.
शिवाजी राजा
थोर आमुचे
सह्याद्री गर्जते..
बोला
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी !!
सामर्थ शक्तिशाली
जय महाराष्ट्र
अभिमानाने म्हणू.
लढलेल्या अमर हुतात्मांना गौरवाची श्रद्धांजली
अर्पण करू..
श्रद्धांजली वाहताना
या आधारस्तंभांना म्हणू
बालके राष्ट्राचा आधारस्तंभ
शिकवू त्यांना
देशहितासाठी लढू...
नमन आमचे हे महाराष्ट्राला
वंदन करूनी या राज्याला
नमन आमचे हे महाराष्ट्राला
वंदन करूनी या राज्याला..
सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा
लाभलेल्या राज्याचे
सर्व मिळून
कौतुक करू.
प्रिय आमुच्या
महाराष्ट्र राज्याला
सर्वानी मिळूनी
अभिवादन करू...
जय जय महाराष्ट्र माझा
अभिमान मला माझ्या राज्याचा जय जय महाराष्ट्र माझा
अभिमान मला माझ्या राज्याचा
