माझे हे मागणे .
माझे हे मागणे .
1 min
151
हे देवा,
माझे एकच मागणे
सुखी ठेव माझ्या बाळाला
आयुष्यभर सुखाने.
कठीण प्रसंग आले
तर खंबीर कर मनाने .
नाजूक ती कळी
ठेव आनंदी आरोग्याने
विदयेचे ज्ञान
मिळवू दे
प्रयत्न भरारीने .
चुकल्यास मार्ग मिळो
तुझ्याच दयेने .
फुलू दे हे जीवन
खूप सुख समृद्धीने .
दिशा लाभो जीवनी
आदर्श संस्काराने .
सारं काही मिळो
देवा तुझ्याच कृपेने .
हेच माझे मागणे देवा
आनंदी जीवन मिळो तिला
तुझ्याच कृपाआर्शिवादाने
