Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rashi Raut

Children

3  

Rashi Raut

Children

आठवण शाळेची

आठवण शाळेची

1 min
151


भूतकाळातील क्षण आठवता

मन हरपून जाते कितीदा .

किती छान शाळेच्या आठवणी

मी आठवून पाहते कितीदा .


शाळेतल्या त्या प्रार्थना

आनंद नि सुखाच्या .

आज ही त्या प्रार्थना ऐकताना

मन प्रार्थनेत गुंतते कितीदा .


मराठीची गोडी आणि

गणिताचा त्रास .

बराच मार खाल्ल्यावर

वाटायचा नको हा

गणिताचा तास .


इतिहास , भूगोल , नागरिक शास्त्राचा

विषयच खूप भारी .

पाठांतर जर का नसले तर

त्याहून छडी बसायची भारी .


आवडीचा विषय चित्रकला

रोज हवा हवासा वाटणारा .

खूप सुंदर असायचा रंग पेट्या

आज ही मनाला भावणाऱ्या .


एकेक विषय आठवताना

सर्व शिक्षक आठवत होते .

सर्व शिक्षकांमध्ये माझ्या

आवडीचे इंग्रजीचे श्री सोनवणे सर होते .


पुन्हा येणार नाही

ते बालपणीचे दिवस

सुंदर ते क्षण 

शाळेचे ते दिवस .


पावसाळ्यात शाळेत

जाण्याची मज्जाच खूप भारी .

आज आठवता शाळेचे दिवस

डोळ्यात येते फक्त पाणी ..


Rate this content
Log in

More marathi poem from Rashi Raut