Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rashi Raut

Inspirational Children

3  

Rashi Raut

Inspirational Children

आमच्या बाईची बाग

आमच्या बाईची बाग

1 min
203


काय सांगू आई तुला

बालवाडीतील जम्मत

लवकर घेऊन चल

तिथे आहे खूप गंमत.


ती शाळा नव्हे .

एक बाग आहे

त्याची काळजी घेणाऱ्या

आमच्या बाई आहे .

तिथे रोपटे नव्हे 

लहान मुले आहेत .

आमच्या बाईमुळे

बागेमध्ये आहेत.


बोटात पेन्सिल धरून

अक्षर ज्ञान शिकवतात.

अंक पाटीवर काढून

गिरवायला शिकवतात .


सुंदर सुंदर चित्र गं आई

काढतात आमच्या बाई .

हळूच रंग भरा म्हणतात

करू नका हो घाई .


तळ्यात मळ्यात खेळताना

खूप आनंद होतो .

रोजच बाई नवा खेळ घेतात

कारण व्यायाम आमचा होतो .


खेळताना गं आम्हाला त्या

ओरडत नाही कधी

मनसोक्त आम्ही खेळतो

कारण रागवत नाही त्या कधी .


बाईंना आमच्या आहे

शिस्तीची ओढ .

नीट नेटकं राहावं

असंच सांगतात रोज .


बाई आमच्या छान

त्यांना मुले वाटतात गोड

आता उशीर नको ग करू

आई मला लवकर

बालवाडीत नेउन सोड


Rate this content
Log in

More marathi poem from Rashi Raut