नवे शिकूया
नवे शिकूया
बरंच काही ठरवलं
ठरवून काही होत नाही .
फक्त संकल्प करून
उपयोग काय ?
संकल्प पुर्ण होत नाही .
संकल्प पुर्ण करण्यासाठी
मनात असायला हवा विश्वास
प्रंचड इच्छाशक्ती ने वाढणारा
प्रबळ असा हा आत्मविश्वास .
संकल्प पूर्ण करण्यासाठी
प्रयत्नांची हवी जोड .
प्रामाणिकपणा कायम टिकून
मनात असावी ओढ.
चांगल्या गोष्टीचा संकल्प करण्यासाठी
नवे वर्षच का असायला हवे ?
रोज येणारी सकाळ
त्यातून ही बरेच काही शिकायला हवे.
दृढनिश्चय , संयम , सहनशक्ती
मनात घेऊन
वेळेचे महत्त्व जाणूया .
मोबदल्याची अपेक्षा न करता
रोज नवे काही तरी शिकुया .
रोज नवे संकल्प करुया.
खूप खूप शिकुया
खूप खूप शिकुया
