असे हे मला प्रेम वाटते..
असे हे मला प्रेम वाटते..
गर्भात तिच्या मी असताना
तिला फक्त माझी चाहूल
तिने न पाहता माझ्यावर
केलेली अखंड प्रीती
म्हणजे मला प्रेम वाटते...
जेव्हा भीती वाटायची मला
तेव्हा हिंमत देण्यासाठी ते
मला ओरडायचे
आणि हळूच मागेही पुन्हा यायचे,
त्यांनी वेळोवेळी घेतलेली माझी काळजी
म्हणजे मला प्रेम वाटते...
कधी रागवले बहीण भाऊ
कधी मित्र-मैत्रिणीत मी रागावली
तरीही माझा वाढदिवस
कधीच विसरले नाही,
तेव्हा आलेले आनंदाश्रू
म्हणजे मला प्रेम वाटते...
मला समजून घेणारी नाती
काही रक्ताची काही परकी
प्रत्येकाच्या भावनांना
शब्दात मांडणे शक्य नाही
असे हे मला प्रेम वाटते..
