STORYMIRROR

Rashi Raut

Tragedy

3  

Rashi Raut

Tragedy

आभाळ अश्रूंचे

आभाळ अश्रूंचे

1 min
129

चंद्राच शीतल चांदण

अंगणात माझ्या आलं

आनंदाच आभाळ जणू काही

भरगच्च बहरून गेलं .

आभाळाला हात लावावा

असचं मला झालं

शक्य नाही ते 

हे माझ्या नंतर लक्षात आलं .

मन मोकळ होत नव्हतं

जखमा झाल्या मनाला

आई होणं नाशिबात नाही

रडून समजावलं मनाला.

मी विसरून ही गेली

मी आई होणार होती .

नऊ महिने सुखानंतरची

वेदना खूप असह्य होती.

सावरलं मी स्वतःला

त्याला खूप दुःख झालं .

मी रडून दुःख व्यक्त केल

त्याच्या डोळ्यात 

आभाळ आलं .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy