STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

4  

Sarika Jinturkar

Inspirational

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील

1 min
277


 सर्व सामान्य जनतेला 

जगण्याचा आधार मिळाला 

ज्ञानदानाचे कार्य करण्यास 

झोपडीत ज्ञानसूर्य उगवला


रयतेच्या शिक्षणासाठी

 जो चंदन होऊन झिजला 

ज्याच्या कार्याचा सुगंध

 दाही दिशात दरवळला

 

प्रकाशमान करण्यास

 जीवन लाखोंचे

 जो स्वतः जळाला

 असा कर्मवीर सांगा 

आम्हास कितपत कळाला 


असंख्य आली संकटे

 कित्येक मिळाली प्रलोभने

 तरी नाही डगमगला 

शुभ्र दाढी, पांढरे कपडे

 कधी डाग ना त्यास लागला


 थोर सौभाग्य महाराष्ट्राचे

 हा कल्पवृक्ष त्यास लाभला

आधुनिक भगीरथाप्रमाणे 

ज्याने ज्ञान गंगेचा 

प्रभाव व्हायला

 उच्च- निच्च,गरीब- श्रीमंत

 हा भेद कधी न केला

हाच तो तपस्वी

 ज्याने मुलात देव पाहिला

स्थापून "रयत संस्था"

 बहुजनांचा ज्यांने 

 उद्धार केला 

प्रणाम माझा थोर अश्या 

शिक्षण महर्षीला...




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational