#कुटुंब
#कुटुंब
घरासारखे घर असावे
नात्यांनी ते घट्ट विणावे.
ढील त्यात जराशी द्यावी
जशी एक एक कळी उमलावी.
कुणी अबोल कुणी असे तापट
उगाच का ती नुसती कटकट.
स्वभावातले दोषही सांगे
समोरच्याने व्हावे जागे .
अवतीभोवती जमून सारे
संस्काराने व्यापून जा रे .
लहानांचे बोबडे बोल
मोठ्यांचे ते जाणतेपण .
आजी-आजोबांच्या प्रेमळ गोष्टी
मुलांनी करावी दंगामस्ती .
खेळीमेळीचा अनुभव सुखद
जेव्हा कुटुंब राहील एकत्रित.
