दडी पावसाची
दडी पावसाची
अरे अरे पावसा
कुठे बसलास दडून
ये ना रे लवकर
दमलो वाट पाहून
उतावीळ आम्ही
तुला भेटण्याला
आला नाहीस म्हणून
करमत नाही आम्हाला
किती जोसरा काढलाय
तुझा सगळ्यांनी
येरे येरे पावसा म्हणून
राग अळवलाय गाण्यांनी
तुला नाही का येत
आठवण आमची
आमची राहू देत
शेतकरी राजाची
पशु पक्षी प्राणी
आतुर झालेत
झाडांनी पण साऱ्या
माना टाकलेत
काळ्याशार ढगांची
दाटी वाटी नाही
निळे कोरडे आभाळ
पहावत नाही
रुसलास का आम्हावर
सांग बरं पावसा
ये तर तू खरा
तुला देतो पैसा
पैसा नको तुला
माहित आहे आम्हाला
झाडे खूप लावून
नष्ट करतो प्रदूषणाला
