STORYMIRROR

Jayashree Patil

Romance

3  

Jayashree Patil

Romance

पण तू

पण तू

1 min
142

गर्दी केली मेघांनी आकाशी

अन् सरसर करीत धाराही अवतरल्या


धांदल उडाली साऱ्यांची माझीही

अन् झाडाखाली जात असताना धडकलीस


धक्क्याने माझ्या पडलीस

मी चटकन हात दिला 


उठलीस पण चिडलीस, रागावलीस, 

बापरे तुझा राग

पावसाच्या मार्यापेक्षा जास्त होता तुझा पारा 


अन सायंकाळच्या वेळी, चिंब पावसात भिजत

तुझ ते रागावन मी थिजून गेलो


तुझ्याकडे पहातच राहिलो

ओलं सौंदर्य तू भानावर आलीस


अंधार पडेल जाऊया का 

मी जाणीव करून दिली 


अन तू चालू लागलीस

जोरात वीज कडाडली, मी आधार दिला 

अन तू नाईलाजाने स्विकारलास,


हात तसाच हातात, घसरून पडू नये म्हणून 

किती चाललो माहित नाही, जाणवलेच नाही 


अन दोघांचे वेगळे रस्ते आले

जाते मी म्हणालीस अन निघून गेलीस 


मी ही घरी गेलो पण 

त्या दिवसापासून मी घरात नाही


अजूनही पाऊस पडत असताना त्या वाटेवर 

चिंब उभा राहून भिजत असतो


पाऊस येतो , मी येतो, पण तू ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance