STORYMIRROR

Jayashree Patil

Inspirational

4  

Jayashree Patil

Inspirational

माझी भाषा

माझी भाषा

1 min
428

भाषा आहे मराठी माझी माता

वंदनीय जशी श्रीकृष्णाची गीता ll

    ज्ञानोबाची भावार्थ दीपिका

    दुरितांच्या ज्ञानाची वाटिका

    जनी मनी येई लौकिका

    शब्द तिचा गोड लागता ll

समृद्ध केली मराठी संतांनी

तुकारामांची अभंगवाणी

दासबोध सांगे राम वाणी

नामदेव एकनाथांची गाथा ll

     लोकभाषा नी बोलीभाषा

     बहिणी जशा उषा निशा

     मातृभाषा दावी त्यांना दिशा

     मातृभाषा ओघवती सरिता ll

मातृभाषेतून सहज शिक्षण

साधना ना मातृभाषे वीण

मातृभाषेतून सुलभ अकलन

भाषे चरणी या टेकवावा माथा ll        


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational