माझी भाषा
माझी भाषा
भाषा आहे मराठी माझी माता
वंदनीय जशी श्रीकृष्णाची गीता ll
ज्ञानोबांची भावार्थ दीपिका
दुरीतांच्या ज्ञानाची वाटिका
जनी मनी येई लौकीका
शब्द तिचा गोड लागता ll
समृद्ध केली मराठी संतांनी
तुकारामांची अभंगवाणी
दासबोध सांगे रामवाणी
नामदेव एकनाथांची गाथा ll
लोकभाषा नी बोलीभाषा
बहिणी जशा उषा निशा
मातृभाषा दावी त्यांना दिशा
मातृभाषा ओघवती सरिता ll
मातृभाषेतून सहज शिक्षण
साधनां ना मातृभाषेवीण
मातृभाषेतून सुलभ आकलन
भाषे चरणी या टेकवावा माथा ll
