माझा विठ्ठल
माझा विठ्ठल
1 min
135
माझा विठ्ठल विठ्ठल
हरी नामाचा गजर
दिंडी संगे वारकरी
विठू भेटीला अतुर
दिंडी चालते चालते
भक्ती भावात तल्लीन
टाळ मृदुंग चिपळ्या
गोड भजन कीर्तन
वाट सरते सरते
ओढ भेटीची लागते
चंद्रभागा बोलाविते
कष्ट सारे निवविते
पाया रचितो ज्ञानोबा
होतो कळस तुकोबा
साधू संत सारे येती
साद घालितो चोखोबा
माझी पंढरी पंढरी
देव उभा विटेवरी
माय विठू रखुमाई
जसा विसावा माहेरी
अरे सावळ्या सावळ्या
रूप तुझे पाहुनीया
तृप्त होते मन माझे
मिळो मोक्ष तुझ्या पाया
