वटवृक्ष
वटवृक्ष
खंबीर आधार
साऱ्या कुटुंबाचा भार
आपल्या खांद्यावर
पेलतो
सतत राबतो
खस्ता किती खातो
तरी हसतो
जीवनात
कणखर प्रसंगी
बळ देई पंखात
सुखात दुःखात
मुलांच्या
हळवा होऊनी
अश्रू लपवे डोळ्यात
मुलीच्या लग्नात
पाठमोरा
बाबा आम्हासाठी
जणू काही देव
आठवणींची ठेव
वटवृक्ष
आयुष्य सुखाचे
पुण्याई पूर्व जन्माची
मुलगी तुमची
धन्य
