STORYMIRROR

Aruna Garje

Inspirational

4  

Aruna Garje

Inspirational

कविता...

कविता...

1 min
6

होता स्पर्श परिसाचा...
 
अज्ञानाचा अंधकार
दूर ज्ञानाच्या स्पर्शाने
शब्द शब्द जुळवुनी
होई सुरेल ते गाणे

स्पर्श होता परिसाचा
लोखंडाचे होई सोने
पावसाच्या त्या स्पर्शाने
निसर्गही गातो गाणे

ढेकणाच्या स्पर्शानेही
भंग पावतो हिराही
कोळशाच्या त्या स्पर्शाने
हिरा काजळत नाही

चंदनाच्या सहवासे
कडुलिंब तो सुगंधी
झाले कडूही चंदन
कुणी पाहिले का कधी?

 झाला वाल्याचा वाल्मिकी
 एका ईश्वरी स्पर्शाने
 स्पर्श कोणता चांगला
 ठरवावे ज्याचे त्याने

 @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational