STORYMIRROR

Aruna Garje

Classics

4  

Aruna Garje

Classics

कविता

कविता

1 min
13

अशा अंधारल्या क्षणी...
 
नको होऊ गं उदास
आणू नको डोळा पाणी
राहू नको गं अबोल
अशा अंधारल्या क्षणी

कधी कधी काळोखात
दिसे आशेचा किरण
वाट दावितो आम्हाला
तोच ठेवावा जपून

भीती का गं तुझ्या मनी
सरणाऱ्या अंधाराची
धीर धरुनी बघावी
थोडी वाट पहाटेची

जरी काजवा इवला
परि चिरे अंधाराला
काळोखात चमकावे
हेचि ठाऊक तयाला

अंधारल्या रात्रीतच
चमकती चंद्र तारे
काळ्याकुट्ट काळोखात
सुखावती मना सारे

उन सावलीचे खेळ
नाव याचेच जीवन
सुखद:ख येती जाती
उगा जावे ना खचून

 @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics