STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

कविता

कविता

1 min
13

सोपं नाही रे जगणं...

असं पावसाचं येणं
सर्वांचाच करी घात
नको अवकाळी पाणी
पिक उभारी शेतात

सुटे वारा सोसाट्याचा
मारा टपोऱ्या गारांचा
पडे फळांचा तो सडा
मातीमोल भाव त्यांचा

करी कष्ट शेतकरी
भरवसा पिकावरी
असं पावसाचं येणं
लागे त्याच्या हो जिव्हारी

पडे पिक ते आडवं
होई पिकाची ती माती
फक्त डोळ्यावाटे पाणी
काम करेना ती मती

नको नको रे पावसा
बरं नव्हे असं येणं
कसं समजावू तुला
सोपं नाही रे जगणं

 @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy