STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

कविता

कविता

1 min
5

सुखशांती लोप पावली...

कुठे मोर्चे कुठे आंदोलन
गुन्हेगारीही खूप वाढली
गगना भिडली आज महागाई
सुख शांती लोप पावली
 
दिवसाढवळ्या खुन बलात्कार
लेक सुरक्षित कुठे ना राहिली
जीव आताशा सतत टांगणीवर मायबापाची झोप उडाली

पेपरफुटी अन् हेराफेरी
आज भ्रष्टाचारी पावलोपावली वखवखलेली नजर भुकेली
पैशाविना ना सरकती फायली

मुकी बिचारी कुणीही हाका
जनता नुसतीच भांबावलेली
सुका कधी तर ओला दुष्काळ
कुणी शेतकऱ्यांचा नाही वाली

चढाओढ ती नोकरीसाठी
हैराण पिढी ही आजची झाली
प्रश्न विचारणे झाले दुष्कर
आत्महत्या फार सोपी झाली
 
मिळेल कैसी झोप सुखाची
वेडी तर मोबाईलने झाली
रातंदिन फक्त घोर जिवाला
सुखशांती आज लोप पावली

 @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy