कुणीतरी
कुणीतरी
असाव कुनी तरी असे ज्याच्यकडे मनमोकळे पणे व्यतीत व्हावं.
अरे मना पाहिजे आपल अस कुणतरी जे निस्वार्थ असाव.
दिवसभर गुंतूनी एकटा कधी तरी व्हावस वाटत व्यक्त कुठेतरी.
अरे मना असाव आपल अस कुणीतरी.
हवे हवे से वाटे मनाला जे जे काही ते ते व्हावे खरे कधी तरी
ज्यासमोर व्हावा खुलासा मनाचा अस असाव आपल अस कुणी तरी.
ना मोह ना माया ना चंचल मन..फक्तं असावा
असा समजूतदारपणाच्या भावनेचा दरवळतो मनी
तो ही निर्मल सुगंध मनाला हवा कधी तरी.
हवे हवे से वाटे रे मना आपले असे कुणीतरी.
हरूनी मन कुणासाठी तरी तो ही समजेन मजला केंव्हा तरी
निर्मळ असो मन त्याचे ही अशी हि येते भावना मणी कधी तरी..
हवे हवे से वाटे रे मना आपले असे कुणीतरी.
ठेऊन मनी भावना त्यातही गुंतुनी कुणासाठी कधी तरी
काय माहिती तो हि समजेन मजला स्वार्थी कधी तरी.
कुणा साठी, का, कशासाठी, ठेऊनी मनात भावना जगतोय मी कशासाठी!
काय माहिती काळ दाखवेल मजला कधी तरी स्वार्थी झालास तू स्वतः साठी.
लाऊनी तर्क स्वताच्या विचारांचा तो हि समजेन कधी तरी
हवे आपले असे असणारे आपले असे कुणी तरी
जे निस्वार्थ होऊनी जगत होते माझ्यासाठी कधी तरी.
तेव्हा त्यालाही वाटेल...हवे हवे से वाटे रे मना मजला माझे असे कुणी तरी.
- शुभम ढोणे

