विसावा
विसावा
या फांदीवरून त्या फांदीवर,
या झाडावरून त्या झाडावर.
कधी झेप घेतो आकाशी,
कधी भेटतो भू मातेशी.
कैक झाली बदलून गावे शहरे,
देशाटन झाले अन् देशही बदलले.
धन प्राप्तीची ही गरज की हाव,
अन्न पाणी निवारे ही बदलले.
सतत बदलतो आहे जागा,
करुनि या पंखाची फडफड.
कसरत ही जीवघेणी जरी झाली,
अजून का चालू आहे धडपड?
थांबेल का ही कसरत पंखाची,
लाभून शांती समाधान या मनाला?
मिळतील का क्षण विसाव्याचे चार,
का फरफट अशीच ही आयुष्याला?
#गंगाशिवकापुत्र
