एक मैत्रीण अशी असावी
एक मैत्रीण अशी असावी
रात्रभर तिच्यासोबत चॅटींग करावे,
दिवसभरातील किस्से तिला सांगावे,
थोडा मी रागावलो तर लगेच रुसावी,
आणि एक मैत्रीण अशी आसावी.
तिच्यासोबत अनेक छायाचित्रे काढावे,
अनेक दिवस तिच्यानावने रंगवावे,
सगळीकडे तोच छायाचित्र तिने ठेवावी,
आणि एक मैत्रीण अशी असावी.
तिच्यासोबत बाहेर कधी-कधी जेवायला जावे,
आजारी असताना तिच्याच हातून पाणी प्यावे,
माझ्यासोबत कॅालवर तासनतास बोलत बसावी,
आणि एक मैत्रीण अशी असावी.
मला ग्रंथालयामध्ये हळूच पहावे,
मी पाहिले की खिडकीमागे लपावे,
माझ्यासाठी संपूर्ण भिंत रंगवून टाकावी,
आणि एक मैत्रीण अशीच असावी.
तिच्यावरती अनेक कविता लिहावे,
तीने तेच कविता गाऊन मला ऐकवावे,
शेवटी माझ्यावरतीच तीने एक कविता लिहावी,
आणि एक मैत्रीण अशी असावी.
तिने तीचे सर्व गुपीत मलाच सांगावे,
अनेक समस्या तिचे मीच सोडवावे,
प्रेयसी पेक्षा जास्त प्रेम तीच करावी,
आणि एक मैत्रीण अशीच असावी.
स्वत:च्या जन्मदिनी फक्त एक कविताच मागावे,
त्याच्या जन्मदिनी खुप वस्तु भेट म्हणूनी द्यावे,
बाहेरून हास्य असूनही डोळ्यांमध्ये अश्रू लपवावी,
आणि एक मैत्रीण अशी असावी.

