STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy

3  

Sarika Jinturkar

Fantasy

खिडकी

खिडकी

3 mins
609

 उगवला नभी सुर्य चराचर सृष्टी सारी जागी झाली

 अंधारी रात्र कुठे तरी गडप झाली उमललेली प्रत्येक एक कळी सोनेरी पिवळी कोवळी किरणे संग धरेवर आली

 अथांग चहुकडे पसरली खिडकीतून डोकावून आत आली हळूच गालाला स्पर्श करुन गेली 

 पहाटेचा तो गारवा स्वच्छंद हवा मनाला स्पर्शून जाऊन दिवसाची आज सुरुवात झाली☺️


 उठल्याउठल्या प्रसन्न सकाळ ही आपली वाट बघत असते आणि ती प्रसन्नता सकाळी खिडकीतून डोकावल्यावर अनुभवता येते  

बाहेरचे निसर्गसौंदर्य, पक्षांचा किलबिलाट, माणसांची वर्दळ, गाड्यांचे आवाज  

हे सर्व अगदी सकाळची सुंदर सुरुवात करून देतात अर्थात खिडकीच्या मदतीनेच ना....

 दिवसाची सुंदर सुरुवात झाल्यावर दिवसभराचा उत्साह ही टिकून राहतो...  

काही खास कारण नसताना कधी किती वाजेपर्यंत इथे बसून राहिले तरी कंटाळा येत नाही

 कधी रिमझिम बरसणारा पाऊस, तर कधी तप्त ऊन 

आठवणीच्या गावात फिरताना सुखद तर काही दुखत अनुभव मनातील भावना इथे तर व्यक्त होतात....  

क्षण कोरे हातातून निसटण्या आधी बाहेरच जग पाहण्यासाठी हवी असते हि खिडकी...

 घराचा अविभाज्य असलेली ही खिडकी आपल्या जीवनातला ही अविभाज्य भाग कधीतरी बनतेच...

 काही कडू-गोड आठवणी दाटून आल्या की मन ही जाऊन खिडकीतच बसते....


 मन हे सैरावैरा धावत असतं कधी सुखद धक्का तर कधी दुखत अनुभव सोबत घेऊन

दम घुटमळतो तेव्हा मोकळा श्वास घ्यायला खिडकीच मदत करते बाहेरून एक छान गार वाऱ्याची झुळूक येते आणि मनाचे दडपण आपल्यासोबत घेऊन जाते...

 खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश ही घरातील नकारात्मक ऊर्जा उडवून लावतो ..

" खिडकी" हा शब्द साधा सोपा असला परंतु मायेचे गोंधण घटनांचे कितीतरी मनात घडलेल्या गोष्टींची एक आठवण अव्यक्त भावनांचे झाकण... हलक्याशा गोष्टीची किनार असते ही खिडकी...

... त्यातून येणारे उन्हाचे कवडेसे फक्त प्रकाश नाही आणत ते आणतात आशेचे किरण स्वप्नांना साकार करण्याचे ध्येय, निश्चित करण्याचे प्रयत्नामुळेच यश मिळेल याची जाणीव करून देणारे एखाद्या वटवृक्षाच्या प्रमाणे भक्कम आधार देणारे समोर काही आले तरी त्याला संपवण्याचे सामर्थ दाखवणारे हे वावळल असते परंतु दुसर्‍या क्षणाला अलगद गालावर आली बट सावरणारी नाजूक हळवी झुळूक ही आणणारी असते ही खिडकी...

 सप्त रंगांनी न्हाऊन निघणारी आसमंत दुमदुमून जाणारे हास्यकल्लोळ जपणारी लक्ष लक्ष दिव्यांनी लखलखणारी रोषणाई करताना मदत करणारी अन् त्यातच न्हाऊन निघणारी...

 स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना जरासा ठसका लागला की दुखण्यावर अलगत फुंकर मारायला सदैव सोबत असणारी मोठ्या वाड्याची असो की छोट्या झोपडीची असो प्रशस्त जागा असलेली ज्यात व्यक्ती बसून आरामात झोपी जाईल किंवा उंच उंच इमारतीची फार तर फार चहाचा कप सामावून घेऊ शकेल इतकी जागा असलेली पण तरीही हवीहवीशी वाटणारी

 ही खिडकी... प्रेमाच्या, हक्काच्या, काळजीच्या जिंकण्याचा, हरण्याच्या, बहरण्याच्या, हसण्याच्या रुसण्याच्या मंगल आणि अमंगल अशा कितीतरी घटनांची मुक साक्षीदार असते...


 दैनंदिन जीवनात परगावी प्रवास करीत असताना 

 प्रवास होतो खास खिडकीजवळ सीट मिळाली हा ज्याचा त्याचा असतो हट्टहास 

खिडकीतून बाहेर डोकवणायात मज्जा येते फार 

 उभे असलेले सीट रिकामी मिळते का याची पाहतात सगळेच वाट ...


खिडकी बनते जाते दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग 


 तुकडा जणू काळजाची गोंडस गोड छकुली बाबांची दाखवून खिडकी दातांची गालामध्ये हळूच लाजाते


सोडुनी जाता माहेरा मग निघाली गाडी त्या वळणावरती दूरवर हात हलवतात बाबा तिचे अखेरचा निरोप तो खिडकीतूनी  


दाटुनी आले नभ गगना स्मरणी यावा तो तिचा सजना 

मग ओढ त्या दिशेने मग बहार दृश्य ते खिडकीतूनच ना ...


उभे राहावे लागते रांगेत इतकी गर्दी .

खिडकी ती तिकीट घराची ना...  


अशी ही खिडकी आपल्या मनालाही असावी... नेहमी स्वतःमध्ये हरवलेल्या मला आणि आपण सर्वांना कधी वाटतो ना स्वतः मधून निघावेसे...

 गरज वाटली की मग खिडकी जवळ उभ राहायचं

 बाहेरच जग पाहायचं..

 मला तर वाटते नेहमीच ठेवावी 

उघडी या मनाची खिडकी दारे 

आपोआपच जीवनात येतील सुख शांतीचे वारे  

नितांत सुंदर हे जीवन आहे नाती जपावी ती प्रेमाची सकल सरळ आनंद आहे फक्त खिडकी

असावी उघडी भावनांची.....☺️😊🙏  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy