चांदन प्रकाश
चांदन प्रकाश
अस्तित्व दाखवण्याची इच्छा, प्रत्येकाला असावी
उदया सोबत अस्त होतो सूर्याचा, चांदण्यांना त्याची भीती नसावी
जिंकण्याच्या प्रयत्नात, केलेली ती प्रत्येक युक्ती फसावी
माझीच जिंदगानी माझ्यावरती, मग अशी रुसावी
एकट्याने का होईना, माझाच विचार करून हसावी
उदया सोबत अस्त होतो सूर्याचा, चांदण्यांना त्याची भीती नसावी
कधी तरी कुठे तरी थांबावे, ही आग मनात विझावी
आकर्षणाची ओढ तुझी, पंचक्रोशीत गाजावी
कहाणी माझ्या आयुष्याची, प्रत्येकांच्या ओठावर माजावी
उदया सोबत अस्त होतो सूर्याचा, चांदण्यांना त्याची भीती नसावी
जिंकलेल्या पावलांची ती, स्वप्ने कोण मोजावी
प्रत्येक ती लढाई, विसाव्यात बसताना आठवावी
हे परमेश्वरा हा प्रारब्ध माझा, अजून स्वप्न काय मागावी
उदया सोबत अस्त होतो सूर्याचा, चांदण्यांना त्याची भीती नसावी