सारा प्रवास आठवला...
सारा प्रवास आठवला...
पळण्यात पुढे आयुष्य, कोणता टप्पा गाठला.
मागे पाहताना तो आज, सारा प्रवास आठवला.
डोळ्यात दिसे प्रतिमा, सारं चित्रात आठवला.
आठवणींना निरोप मग, आसवात पाठवला.
योग यावा जुळून, तो प्रश्न मना साठला.
मागे पाहताना तो आज, सारा प्रवास आठवला.
सुटले कित्येक स्वप्न, इच्छाना तो गोठवला.
वाढते जवाबदारी, मग नाद सारा सोडला.
नव्याने जगण्याचा, नवा नारळ फोडला.
मागे पाहताना तो आज, सारा प्रवास आठवला.
आठवते मला सतत, कधी कधी जीव कोंडला.
डाव माझा अर्ध्यावरती, कित्येकदा तू मोडला.
आपुलकीचा धागा मग, असा कोण अलगद तोडला.
मागे पाहताना तो आज, सारा प्रवास आठवला.
डोळे झाकून पाही, देव माझा नटलेला.
काळ गेला फार असा, अलगद सुटलेला.
साध्या जगण्यात असा, काय जणू पावलेला.
मागे पाहताना तो आज, सारा प्रवास आठवला.
