नवरात्र (रचना 1)
नवरात्र (रचना 1)
आसमंतावर साऱ्या
रंग केशरी पसरला
तेजोमय सूर्याचा जणू
तिने वेश धारीला
शौर्याचे प्रतिक होऊनी
जिंकले तिने जग सारे
रणरागिनी होऊनी दिस
तिच्यात सूर्याचे तेज सारे
शौर्य तिचे शोभे
हास्य वदनी चेहऱ्यावर
मांगल्याचा प्रभाव पसरला
आज साऱ्या जगावर
