हिरवे रान
हिरवे रान
हिरवी पाने हिरवी राने
हिरवा हिरवा डोंगर
हिरवी हिरवी गवतफुले
डोलतीय वाऱ्यावर
हिरवा चुडा हिरवी चोळी
लेवून शालू हिरवा
पाहता देखने रूप तिचे
नयनी मिळे गारवा
बघून हिरव्या हिरव्या रानाला
येई उधाण उत्साहाला
राबतो शेतकरी त्या उन्हात
कुदळ फावडे हातात
सारे कष्ट जातो विसरूनी
काम करी शेतात
पक्षीही गाती गीत मनोहर
चैतन्याचा वारा वाहे भरभर.
