STORYMIRROR

Anushree Dhabekar

Romance Fantasy Inspirational

3  

Anushree Dhabekar

Romance Fantasy Inspirational

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

1 min
191

रेशीमगाठ बांधली तुझ्यासोबत 

गालात हसून मी शहारली

नकळत प्रित जडली तुझ्यावरी 

तिथेच आपली प्रित फुलली


अंगणात ठेवताच पाऊल

पाहून सख्या महल प्रेमाचा

काळजात जपून ते क्षण 

उंबरठा ओलांडला तुझ्या नावाचा


सजली रात्र मिलनाची

पाहून प्रेमाचे तरंग उठले

चाहुल लागताच गुलाबी थंडीची

मन माझे आतुरले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance