STORYMIRROR

Anushree Dhabekar

Inspirational Others

3  

Anushree Dhabekar

Inspirational Others

पिंडदान (मुक्तछंद)

पिंडदान (मुक्तछंद)

1 min
165

हाय..रे... देवा.. अजब तुझी दुनिया

तुझ्याच पायरीवर भुकेलेले चेहरे

कोणाचा पिंडदान श्राध्दात पुजणार...??


पुटपाथवर निजलेले व्याकुळ मन

मोकळ्या आकाशात तुलाच शोधतात 

खीर पुरीचा नैवेद्य अर्पून 

कावळ्यांना कसे बोलावणार..??


जातपात, दंगली घडल्या 

वर्ण भेदावरून रक्त सांडले 

श्राद्धाच्या दिवशी कसे सगळे

एकाच रंगात भूवर आले


काळा, गोरा, उच, नीच 

गरीब श्रीमंतीची दरी नाही

सगळे कसे स्वच्छंदी मनाने

एकाच आवाजात गाणे गातात


प्रत्येक पात्रात मालपुवा

खिरीवर तुपाची धार 

अतृप्तांना तृप्त करण्यास 

मंजुळ स्वर आसमंतात घुमतो


अंतर्मनात दुःखाचे सावट 

पिंडदानचा अर्थ सांगण्यास 

पूर्वजांच्या दिवसावर 

एक भुकेलेल्याला तृप्त करं

देऊन संदेश कावळ्यांना  

पाठव सृष्टीवर आता लवकर..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational