STORYMIRROR

Anushree Dhabekar

Romance Classics Fantasy

4.5  

Anushree Dhabekar

Romance Classics Fantasy

पर्जन्यगाथा

पर्जन्यगाथा

1 min
11

पर्जन्यगाथा

नभांगणी नीलमणी मेघांचे मखमली सिंहासन,
विद्युल्लतेच्या सुवर्णरेषांनी खुलले दिव्य आकाशमंडप.

पर्जन्यधारांचे मुक्ताहार अवनीच्या कंठी विराजले,
धरणीने हरित पाचूचा शालू नेसून सौंदर्य फुलविले.

मृद्गंधाच्या दिव्य सुवासाने प्राणांत चेतना जागल्या,
थेंबांच्या नूपुरनादावर वनराई आनंदाने डोलल्या.

निर्झरांनी रौप्यवीणेचे मधुर स्वर छेडले,
सरितांनी जीवनरसाचे मंगल गीत आळविले.

इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी कमानीत स्वर्ग अवतरला,
धुक्याच्या शुभ्र शालीत गिरिराज अलौकिक भासला.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance