STORYMIRROR

Anushree Dhabekar

Classics Inspirational Others

3  

Anushree Dhabekar

Classics Inspirational Others

ज्योतीबाची सावित्री

ज्योतीबाची सावित्री

1 min
189

ज्योतीबाची बनून सावली

शिक्षणाचा घेतला वसा

गोरगरिबांच्या विचारांना 

दिली एक नवी दिशा


मुलींना शिक्षित करण्यास

काट्याकुंपण्यातून चालली

अंगावर झाली चिखलफेक 

त्यातूनही तिने वाट काढली


अनिष्ट रूढी परंपरे विरूद्ध 

समाजात बंड पुकारले

विधवा पुनर्विवाह करण्यास 

समाजाला प्रेरित केले


ज्योतीबा सावित्रीबाईने

स्त्रीयांना दूरदृष्टी दिली

तिच्याच कष्टाचे फळ आहे

लेखणीने स्त्रीला सन्मान दिला


सावित्रीची लेकरे आम्ही 

एक दिवा आज लावतो

तिच्या यशोगाथेची ज्योत

नेहमीसाठी प्रज्वलित ठेवतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics