STORYMIRROR

Anushree Dhabekar

Inspirational Others

3  

Anushree Dhabekar

Inspirational Others

तुझ्या विरहात (षडाक्षरी काव्य)

तुझ्या विरहात (षडाक्षरी काव्य)

1 min
154

तुझ्या विरहात 

चंद्रभागा तिरी

सावळा विठ्ठल 

उभा विटेवरी


भक्तांचा मेळावा

चंद्रभागा तिरी

रुक्मिणी पाहून 

दुःखी वारकरी


भाकरी करून 

सांगावा धाडला

शिदोरी देऊन 

पंढरी राजाला


आषाढी कार्तिकी 

माळा सजणार 

टाळ मृदुंगात 

दुःख हसणार 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational