STORYMIRROR

Anushree Dhabekar

Classics Inspirational Others

3  

Anushree Dhabekar

Classics Inspirational Others

अनमोल लाभले जीवन

अनमोल लाभले जीवन

1 min
3

मातीत बीज ते पाठवून 

परमात्म्याने चेतना दिली

नकळत नाळ ती जोडून 

माय लेकीची गाठ बांधली 


बाहेर पडता सुखावली

जणू मूर्ती माय वात्सल्याची 

तिच्या पदरा आड जाऊन 

स्पंदने ऐकली हृदयाची


आयुष्याचा मार्ग दाखविला

प्रेम, आपुलकीची साऊली

उब देऊन घरकुलात 

सदैव हसली ती माऊली


अनमोल लाभले जीवन 

आजही मी तिच्याच ऋणात 

पुढचा जन्म जरी मिळाला

स्मरेल तिला या चेतनात



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Classics