STORYMIRROR

Anushree Dhabekar

Romance Classics Inspirational

4.2  

Anushree Dhabekar

Romance Classics Inspirational

धुक्याची वाट

धुक्याची वाट

1 min
11



धुक्याची ही वाट जशी,
तशीच तुझी आठवण…
दिसत नाही स्पष्ट काही,
पण जाणवते प्रत्येक क्षण…

पहाटेच्या थंड वाऱ्यात,
तुझं नाव विरघळून जातं,
मन मात्र त्या धुक्यातून
तुलाच शोधत राहतं…

हातात हात नसताना,
स्पर्श तुझा भासतो,
एकटेपणाच्या गर्दीतही
तू जवळच असल्यासारखा वाटतो..

धुकं जसं अलगद सरकतं,
तसंच प्रेमही शांत असतं,
शब्द नसले तरी डोळ्यांत
एक पूर्ण जग दडलेलं असतं…

कधी वाट हरवून जाते,
कधी पाऊल थबकतं,
पण तुझ्या आठवणींचा दिवा
माझ्या वाटेला उजळतं…

ही धुक्याची वाट संपेल कधीतरी,
सूर्य पुन्हा उगवेल,
पण तुझ्यावरचं माझं प्रेम
धुक्यासारखं मनात कायम राहील…

✍️
Anushree Dhabekar 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance