पत्र फौजी भावासाठी
पत्र फौजी भावासाठी
प्रिय भाऊराया,कसा आहे हे विचारणार नाही कारण तू सांगणार नाही. आम्ही सर्वजण एकत्र घट्ट नात्याने इथे राहत आहोत. मला खूप काही लिहिता येत नाही कारण माझ्यापेक्षा भाऊराया तूच हुशार आहे
काय सांगू तूला..
आपल्या घरची माया
माय बाप बणून..
जपते तुझ्या काळजाला
सकाळ पासून वहिणीची नजर उंबरठ्यावर आहे. तिला तुझी खूप आठवण येत असणार कारण आज करवा चौथ आहे हे तुला माहीत आहे का..??
सोळा श्रृंगार करूण
वाट पाहत छतावर
चंद्र होता साक्षीला
नजर तिची तुलाच शोधत...
आईने सुध्दा करवा चौथचे व्रत केले. आज किती दिवसांनी तिने तू पहिल्या पगारात घेतलेली साडी नेसून वहिणी जवळ जाऊन ऊभी राहीली.
न कळत तिच्या नयनात
आसवांनी गर्दी केली
सुनेच्या डोळ्यात पाहता
मुलाचा अभिमान दिसला
भाऊराया चंद्र निघाला होता, मी आरतीची ताट हातात घेऊन आई जवळ उभी होती..चाळणीतून नभातील चंद्राचे दर्शन घेऊन
नंतर आपल्या चंद्राचे दर्शन तिने घेतले. पण त्याची नजर आपल्या लेकीकडे होती.. तिच्या मनातील कानोसा घेत म्हणाले
मुली दूर असेल तूझा चंद्र
तो ही असेल झुरत
आपल्या स्पदंनातील चादंणीला
आठवणीत तो असेल पाहत.
मी तूझा फोटो चाळणीवर ठेवून वहिनीला उपवास सोडायला लावला. आई बाबा होतेच तिच्याजवळ तिला धीर देत ते म्हणाले
तू आहे त्याच्यासोबत
म्हणून तो लढत आहे
त्याच्या पेक्षा आम्हाला
मुली अभिमान तुझा आहे.
वहिनीने हसत हसत तुझा फोटो पाहून उपवास सोडला. आई बाबाचा आशिर्वाद घेतला. आणि मायला घट्ट मिठी मारून आनंदाची बातमी दिली.
या गोजिरवाण्या घरात
बाळकृष्ण रागंणार
फौजीची माय म्हणून
मी सुध्दा मिरवणार
आई बाबा ऐकून तर खूप खूश झाले नकळत त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बाबाने आनंदाची बातमी वहिनीच्या माहेरी दिली आईने आज तिला आपल्या हाताने घास भरवले. हा क्षण मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
रेशमाचा धागा
तुझ्या मनगटावर भाऊराया
मी जेव्हा जेव्हा पाहते
अभिमानानं मी मिरविते
मी आज तूला
माझ्या मनातील सांगते
स्वप्नातला राजकुमार
फौजीच पाहते...
भाऊराया करशील का तुझ्या गुडीयाची ही ईच्छा पूर्ण.
सीमेवर उभा आहे
तिरंगा त्याच्या हाती आहे
लाल दुपट्टा मलमलचा
मला ओढून गेला आहे.
तू घरी येताना माझे स्वप्न आणि तूझे स्वप्न सोबत घेऊन ये.
बाकी काय लिहू..आता शब्द फुटेना..तरी चार शब्द लिहीते..
अभिमान आहे मला
माझ्या फौजी भाऊरायावर
घेतले प्रण तुने..
मातृभूमीच्या रक्षणाचे
मिळावा प्रत्येक जन्म मला
फौजी भाऊरायाच्या बहिणीचा..
तुझीच लाडकी,
गुडीया
