STORYMIRROR

Anushree Dhabekar

Romance Inspirational Others

3  

Anushree Dhabekar

Romance Inspirational Others

वाढदिवस

वाढदिवस

1 min
187

माझा आंबाडा होता सूना सूना

तोही हिरमुसला थोडा थोडा

आरश्यात पाहून मलाही वाटले

सख्याने गजरा माळायला हवा

    

इकडून तिकडे निरखून पाहीली

चेहर्‍यावर माझा रंग दिसेना

ओठांवरची लिपस्टिक डार्क होती

तरिही मला फिकीच वाटली

   

 कपाळावर टिकली चमकीची होती

तरीही आरश्यात चमकत नव्हती 

कितीदा ती बदलवून पाहीली

तरीही चेहरा चमकत नव्हता...

    

 साडी होती काठपदराची

भरजारी ब्लाऊज शोभणार वाटला

तोही आज ऊठून दिसेना

आता मलाच तयारी आवडत नव्हती 

   

 दरवाजा आडून सखा हसला

राणी किती स्वतःलाच पाहशील 

हळूच येऊन गजरा माळला

आंबाडा माझा खळखळून हसला

    

अलगद ओठ कपाळावर ठेवले

प्रतिबिंब आरश्यातून अलगद लाजले

राणी माझी आता खुलली

म्हणून त्याने जवळ घेतले

   

एका क्षणात मी शहारली

त्याच्या मिठीत बंदिस्त झाली

वाढदिवस माझा गोड झाला

आठवण आज हृदयात कोरली...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance