STORYMIRROR

Anushree Dhabekar

Inspirational

3  

Anushree Dhabekar

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
16

अंधार दूर करण्याला 

पणतीची गरज असते

दुःख सावरायला मानवा

स्त्रीची गरज भासते


जीवनात संस्काराची 

चार माणसे जरूर असते

घराला आधार देण्यास 

खंबीर स्त्रीचे हात दिसते


उद्याची शिदोरी सांभाळण्यास 

आज स्त्रीची कुस बहरते

अमावस्या पौर्णिमेच्या शक्तीने 

सागराला भरती ओहोटी येते


गर्द केशरांच्या माळेत

स्त्री शक्तीचे रूप दिसते

तिचे मान सन्मान जपता

स्त्री शक्तीचे नवरंग हसते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational