ओल्याचिंब वाटेवर
ओल्याचिंब वाटेवर
1 min
183
ओल्याचिंब वाटेवर
कसा सावरू मनाला
आठवता प्रिये तुला
वेडापिसा जीव झाला
ओल्याचिंब सांजवेळी
अंग माझे शहारले
शब्द तुझे ऐकण्यास
मन माझे आतुरले
भावनांच्या कल्लोळात
साजंवेळ बहरली
तुला मिठीत घेण्यास
बघ स्पंदने मोहरली
बहरली रातराणी
तुझ्या प्रितीचा गंध
आसमंती बहरून
मन होणार सुगंध
ओल्याचिंब वाटेवर
सहवास दे सखीचा
गंध तुझ्याच प्रेमाचा
स्पर्श अबोल प्रितीचा
