आनंदाची दिवाळी (सुधाकरी काव्य)
आनंदाची दिवाळी (सुधाकरी काव्य)
आनंदी चेहरे ॥ आली ही दिवाळी॥
हसे वनमाळी ॥ बगिच्यात ॥
कंदील लावून ॥ चेहरे खुलले ॥
निरागस मुले ॥ बागडते ॥
अंगणात सडा ॥ रांगोळी सजली ॥
गृहीणी हसली ॥ श्रृंगारात ॥
लक्ष्मीचे पूजन ॥ दिव्याची आर्हास ॥
मनोमनी आस ॥ साजंवेळी ॥
फटाके फोडून ॥ उधळती रंग ॥
सगळेच दंग ॥ दिवाळीत ॥
बहिणीची ओढ ॥ माहेरी जाणार ॥
बंधू भेटणार ॥ भाऊबीज ॥
दुःखाचे ते भाव ॥ मनोमनी ठेवू ॥
गोडधोड देऊ ॥ गाठीभेट ॥
अशी ही दिवाळी ॥ सर्वांना सुखात ॥
जावो आनंदात ॥ पांडुरंगा ॥