झाली केवढी घाई
झाली केवढी घाई
बघता बघता शेवट आला, वेळ अलगद निघून जाई
काय लिहावे आता, झाली केवढी घाई
आठवण येते किती, चित्त नव्हते ठाई
कमवले त्या कित्येक आठवणीं, नशीब झाले पाई
रागडता प्रयत्नांचे कर्म, यशाचे मग गाणे गाई
काय लिहावे आता, झाली केवढी घाई
कधी वाटते आता, पर्याय उरलाच नाई
नसते कोण ज्याचे, त्याचे असतात फक्त साई
मुक्त फुलांचा सुगंध, दरवळतो जुई जाई
काय लिहावे आता, झाली केवढी घाई
