गुलाबी थंडी..
गुलाबी थंडी..
गुलाबी थंडी मंदधुंद गारवा
सर्वत्र शुभ्र धुक्याची चादर
शिशिर पानगळ ॠतु आगळा
गुलाबी थंडी अंगावर शहारा
थंडीची लहर घेऊन येतो
पहाट वारा
गुलाबी थंडी
किरण कवडसा देतो उबारा
मोत्यासम दवबिंदू पानांवर सजले
अनुभवावा पहाटेचा सुंदर नजारा
गुलाबी थंडी
ऊन कोवळे धावून येई
उल्हासित होई धरा
पान- फुले करी रंगाची उधळण
साज लेण्या पुन्हा नवा
गुलाबी थंडी
आनंदाने नटलेला
निसर्ग सारा
श्वास दंगला जाई गुलाबी क्षणात
अलगद मनाला स्पर्शूनी जाई बेभान वारा...
