दिवाळी
दिवाळी
सजविले घर दिव्यांनी
रंगविले अंगण रंग रांगोळीनी
मिठाई ने तोंड गोड करीत
आनंदाचे गीत मी गाते
पणत्यांचा करून झगमगाट
आकाशी नक्षत्रांचा लखलखाट
सगळ्यांची मनं करीत हर्षित
प्रेम सद् भावनेचे ताट मी सजवते
मुखावर हास्य आज खुशीचे
आशिर्वाद मिळवाया सुख समृध्दीचे
एकजुटीची हृदये जोडत
सगळ्यास विजय मी इच्छिते
सुखाचे किरण येवो दारी
लक्ष्मीच्या पावलांनी उजळूदे घरी
नवे पर्व, नवे विचार घेऊनी
संकल्प पूर्तीचे मी आज करिते
मधुर तालावर मन डोलते
सुगंध चहू दिशांनी पसरते
जीवनातला काळोख पुसून काढत
सप्तरंगी दिवाळीची शुभेच्छा मी वाहिते
