अबोली
अबोली
चंपा, चमेली, जाई, अबोली
रंगबिरंगी बाग बहरली
बहर पाहुनी वेडी पिशी
वेचु धावी ती पिटुकली॥१॥
खुडती फुले नाजुक कळी
ओटीत सुगंधी भरूनी लिली
दरवळ पसरे चराचरातुनी
रात पहुडती नभी बिलगुनी॥२॥
सुंदरीचे रूप खुलविती
गुंफुनी वेणी फुल अबोली
सजुनी माथी मोहक युवती
नऊवारी संग भरजर चोळी॥३॥
बकोड्याचा साज चढवुनी
नाजुक अबोली शोभे वरती
मज भावी ती फुलांची फाती
खुलत होती आईच्या माथी॥४॥
आई आता राहिली नाही
अबोलीही पडली एकटी
ह्या फुलांचा गंध लुटाया
अप्सरा ती नसेल भवती॥५॥
