STORYMIRROR

Purnima Desai

Others

3  

Purnima Desai

Others

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
117


पावसाच्या श्रावणधारा

पडती बघ झरा झरा

जसे स्वप्न नवे हे प्रहरा

आनंद जणु चौफेरा

    मन पाहे हर्षून बहरा

    स्पर्श न्हवे हा वारा

    चिंब होई फुलवुन मोरपिसारा

     टिकती हबकून सर्वाच्या नजरा

बरसे वर्षा माझीया दारा

जसे उधळती फेसांचा फवारा

नाचे ऊतुंग सखीयांचा पसारा

पाहुन श्रृष्टीचा हा रम्य नजारा

    भुकंपित होई वादळवारा

    मधेच आक्रमक त्या लहरा

    कडकडाट हा विजेचा घाबरा

    उडे मनाचा भयाने थरथरा

बाळ घट्ट धरे आईच्या पदरा

फुटतो ममतेला रे पाझरा

ओसंडित वाहती जलधारा

जणु चैतन्य पसरले घरान घरा


Rate this content
Log in