चंद्र पौर्णिमा
चंद्र पौर्णिमा
चंद्र पौर्णिमा
जिथे चंद्र तारे
प्रीतीचे धुमारे
तुला भेटण्याचे
स्वप्न हे बेचारे
स्पर्शात तुझीया
लपले जे सारे
नजरेची किमया
मज मी निहारे
तुझे रूप चित्ती
कोरुन घेता
हातात हात हा
देशील ना रे?
दिप हे पेटवूनी
देऊ उजळून सारे
तुझ्या माझ्या प्रितीतले
रंगीन नजारे
शीतल चांदणे हे
न्हाऊस घाले
तुझीच होऊनी मी
राहिले जिवलगा रे
.... पूर्णिमा देसाई

