चिऊताई
चिऊताई
चिऊताई
कोण गं तिथे
चिमणी??
ये ना गं चिऊताई
नेहमीच असते तुला घाई
दूर अशी जातेस
कधीची परत येतेस
पिल्लूसाठी दिवसभर
रान रान करतेस
बारीक बारीक डोळ्यानी
जग बरं पारखतेस
इवल्याशा चोचीने
पिल्लांना भरवतेस
येवून जाऊन
लक्ष तुझं घरट्यावर
उब देत वाढवते
माया लावून पिल्लावर
पिलं मोठी झाल्यावर
पंख लावून उडणार
झेप घेत आकाशी
जग पाहू फिरणार
चिऊताई खरं सांग
होतो ना गं त्रास तुला
पिल्लं उडून गेल्यावर
एकटं एकटं रहायला?
