राजसा
राजसा
किती उमलु मी किती बहरू मी
नजाकतीने वा-यासंगे
गुलाबी थंडीत अशा
चमचमत्या ता-यासंगे
चांदण्यांच्या सावलीतही
मनमौजेने नाचुन राहे
धुंद होऊनी फेर धरूनी
रात रमलांची वाट पाहे
जोर जसा हा वा-याचा मज
घेऊन जाई अपुल्या संगे
घेऊनी मिठीत अलगद अपुल्या
प्रहराच्या स्वप्नात डुंबे
अभयाचा हा उल्हास बेरका
लाडाने मज फसवु पाहे
मीही ठरवुनी खेळ खेळते
डाव प्रेमाचे त्याच्यासहे
भोळी अल्लड होते मीही
जादुत पापण्यांच्या फसाया
रूप मोहिनीतुनीही त्याच्या
चपळतेने सोडवुनी घ्यावया
मोहरूनी अशी प्रेमात धुंद
उधळतेही पुष्प सुगंध
सजवुनी सेज चांदण्यांची
राजसा गुंतते हृदय तुडवुनी बंध

